Mouni Roy Photos in Yellow Saree: नागिणी फेम मौनी रॉय (Mouni Roy) चे साडीवरील प्रेम (Saree Love) कोणापासूनही लपलेले नाही. वेस्टर्न व्यतिरिक्त ती अनेकदा पारंपारिक ड्रेसमध्ये दिसते. विशेषतः मौनीला साडी नेसायला आवडते. यावेळी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसून चाहत्यांना घायाळ केलं आहे. या साडीच्या किमतीने लोकांचे होश उडाले आहे. 84000 हजार किमतीची ही साडी कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला (Neeta Lulla) यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या शिफॉन साडीच्या बॉर्डरवर सिक्विन बॉर्डर असून रफलही बनवली आहे. मौनीची ही स्टाईल लोकांची मने जिंकत आहे. या फोटोंमध्ये मौनीची वेणीदेखील चाहत्यांना भूरळ घालत आहे. बबल वेणीत बांधलेल्या तिच्या केसांनी तिचा लूक पूर्ण केलाय.
मौनीने हलका मेकअप केला आहे आणि डोळ्यांना हलके आयलायनर लावले आहे. स्लीव्हलेस ब्लाउज आणि बोटात अनेक अंगठ्या यामुळे तिच्या लुकमध्ये आणखी भर पडली आहे. (वाचा - Vidya Balan आणि Shefali Shah चा Jalsa चित्रपट Amazon Prime Video वर होणार प्रदर्शित; तारीख आणि चित्रपटाची कथा काय आहे? जाणून घ्या)
मौनी राय कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य लोकांची मने जिंकत आहे. नागिणी फेम मौनी रॉयने काही दिवसांपूर्वीच तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले आहेत.
View this post on Instagram
मौनी सूरजसोबत काश्मीरमध्ये तिचा हनिमून एन्जॉय करत आहे. लग्नाच्या फोटोंचा ओघ संपल्यानंतर लगेचचं मौनीच्या हनीमूनच्या फोटोंची झलक समोर आली. या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून लाईक्स तसेच प्रेम मिळत आहे.
View this post on Instagram
नुकताच मौनीचा नवीन म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. या गाण्यात तिच्यासोबत टायगर श्रॉफही दिसत आहे. टायगर आणि मौनी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हे पंजाबी गाणे असून पूरी गल बात असे या गाण्याचे स्वर आहेत. विशेष म्हणजे हे पंजाबी गाणे टायगरने गायलं आहे. ज्यानंतर टायगरने खुलासा केला की, हे त्याच्या आयुष्यातील आतापर्यंतचे सर्वात आव्हानात्मक काम आहे. या गाण्याला रसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गाण्यातील टायगर आणि मौनीच्या केमिस्ट्रीची अनेकांनी प्रशंसा केली आहे, तर अनेक यूजर्स याला कॉपी केलेले गाणे म्हणत आहेत.