Holi 2022: बॉलीवूडमध्ये होळी उत्सहात साजरी; Amitabh Bachchan, Akshay Kumar, Hrithik Roshan, आदी कलाकारांनी चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा!
Amitabh Bachchan, Akshay Kumar, Hrithik Roshan (PC - Instagram)

Bollywood Holi 2022 Celebrations: देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे होळीचा रंग फिका पडला आहे. यावेळी कोरोनाचे प्रकरण आटोक्यात असल्याने साहजिकच होळीची धूम आहे. होळीच्या निमित्ताने आज 'बच्चन पांडे' चित्रपटगृहांमध्ये तर विद्या बालनचा 'जलसा' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. या सणाच्या निमित्ताने बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर चाहत्यांना आणि फॉलोअर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी सर्वांना सुरक्षित होळी खेळण्याचे आवाहन केले आहे.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील श्री विठ्ठल मंदिरातील देवाचा फोटो शेअर करून खास मराठीतून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - Dhulivandan 2022 Messages: धुलिवंदनच्या दिवशी मराठी Greetings, Wishes Images, WhatsApp Stickers द्वारे मित्र-परिवारास द्या रंगाच्या सणाच्या शुभेच्छा!)

अक्षय कुमारने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलयं, 'तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.'

कपिल शर्माने म्हटलंय, 'तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.'

याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने लिहिले आहे की, 'सर्वांना नमस्कार, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

काजोलने लिहिलंय, 'पूर्ण ब्लॅक आणि होळीसाठी तयार.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

दरम्यान, जुही चावलानेही सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने शुभेच्छा देताना लिहिलंय आहे की, 'तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा रंग तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणो आणि तुमच्या हृदयात आनंदाची भावना कायम राहो.'