Holi 2020: ऐश्वर्या राय बच्चन, भूमी पेडणेकर, ऋषी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या होळीच्या शुभेच्छा!
Aishwarya Rai, Bhumi Pednekar and Rishi Kapoor (Photo Credits: Instagram/Twitter)

होलिकादहनानंतर आज देशभरात रंगपंचमी, धुळवडीचा उत्साह पाहायला मिळेल. रंगांची लयलूट करत अनेकजण हा रंगोत्सव साजरा करतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आज होळीच्या रंगात न्हावून निघतील. मात्र यंदा कोरोना व्हायरसची दहशत पाहता होळीच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रेटींही यंदा होळी सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही शुभेच्छा देऊन आपण यंदाची होळी नक्कीच आनंददायी करु शकतो. आपल्या लाडक्या सेलिब्रेटींही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या राय बच्चन, भूमी पेंडणेकर, ऋषी कपूर, अनुपम खेर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा देत होळीचा उत्साह वाढवला आहे. (Holi Songs 2020: ताल धरायला लावणारी 'ही' खास गाणी ऐकून यंदाची होळी करा सेलिब्रेट!)

ऐश्वर्या राय बच्चन:

 

View this post on Instagram

 

✨🔥Happy Holi to All💝Love n Light✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

ऋषी कपूर:

अनुपम खेर:

भूमी पेडणेकर:

 

View this post on Instagram

 

Holi Hai ❤️ #NoColour #DryHoli #SaveWater #Holi #BeSafe #goodmorning

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

डब्बू रतनानी:

भारतासह महाराष्ट्रातही होळीची विशेष धूम असते. कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो. पुरणपोळी, थंडाई हे पदार्थ होळीचा आनंद द्विगुणीत करतात. मात्र यंदा होळीवर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने रंग खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.