अक्षय कुमारने रचला इतिहास; एका वर्षात कमावले तब्बल 700 कोटी, असा भारतातील एकमेव अभिनेता
अक्षय कुमार (Photo Credits: Instagram)

जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये बॉलीवूडच्या अक्षय कुमाचे (Akshay Kumar) नाव हमखास सामील असते. मात्र आता अक्षय कुमारने इतिहास रचला आहे. एका वर्षात बॉक्स ऑफिसवर 700 कोटींची कमाई करणारा तो बॉलीवूडचा एकमेव अभिनेता ठरला आहे. अक्षयचा केसरी (Kesari), मिशन मंगल (Mission Mangal), हाऊसफुल 4 (Housefull 4) आणि गुड न्यूज (Good Newwz) हे चार चित्रपट वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाले. महत्वाचे म्हणजे या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. अक्षय कुमारने 2019 मध्ये 153 कोटींची कमाई केलेल्या, 'केसरी' चित्रपटापासून सुरुवात केली होती.

त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट 'मिशन मंगल' होता, ज्याने 200 कोटींची कमाई केली. त्याचा हाऊसफुल 4 या तिसऱ्या चित्रपटाने 206 कोटी रुपये कमावले आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या, 'गुड न्यूज' चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटींची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचतच आहे. अशा प्रकारे अक्षय कुमारच्या चित्रपटांनी कमाईबाबत 700 कोटींचा आकडा गाठला आहे. (हेही वाचा: #Video: 'Nirma Advance' ची जाहिरात केल्याने अक्षय कुमार अडचणीत; वरळी पोलिसांकडे इतिहास प्रेमींची तक्रार)

एका वर्षामध्ये सर्वाधिक कमाई केलेले 5 स्टार -

अक्षय कुमार (2019) - 4 चित्रपट - 719.49 कोटी

रणवीर सिंह (2018) - 2 चित्रपट - 542.46 कोटी

सलमान खान (2015) - 2 चित्रपट - 530.50 कोटी

प्रभास (2017) - 1 चित्रपट - 510.99 कोटी

हृतिक रोशन (2019) - 2 चित्रपट - 464.85 कोटी

फक्त 2019 बद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमार नंतर, हृतिक रोशनने फिल्म वॉरमधून 317.91 कोटी आणि सुपर 30 मधून 146.94 कोटी कमाई करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. टायगर श्रॉफ तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 387.02 कोटी कमावले आहेत. ही कमाई त्याच्या वॉर (317.91) आणि स्टुडंट ऑफ द इयर (69.11 कोटी) ची आहे.