आजवर अनेक कलाकार जाहिरातीच्या मार्गातून चुकीचा संदेश बेजजबादारपणे देत असल्याचे आरोप लगावले गेले होते, यात अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिची फेअर अँड लव्हलीची जाहिरात, अजय देवगण (Ajay Devgan) याची विमल पान मसाला जाहिरात आणि यावरून त्यांना सहन करावे लागलेलं ट्रोलिंग आपणही जाणून असाल. यामध्येच आता अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला सुद्धा इतिहासप्रेमींचा रोष पत्करावा लागत आहे. निरमा पावडर (Nirma Advance Washing Powder) ची जाहिरात करत असताना अक्षय कुमारने महाराज अशी भूमिका करत अप्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान केल्याचा इतिहासप्रेमींचा आरोप आहे. या प्रकरणी सूर्यकांत जाधव आणि आणि विजय कदम यांनी वरळी पोलिसांकडे (Worli Police) लिखित नोंदवली आहे. समाज भान असणाऱ्या अभिनेत्याने असे वागणे गैर असल्याचे म्हणत अक्षयने महाराजांची माफी मागावी अशी मागणी सध्या समोर येत आहे.
वरळी पोलिसांकडे तक्रार
काय आहे जाहिरात ?
निरमा पावडरच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतलेले असतात. त्यावेळी त्यांच्या पत्नी त्यांचे औक्षण करतात. एक महिला मात्र आपल्या पतीला युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर टोमणा मारते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. ज्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, ” महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!” आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. यात गाणी म्हणत नाचत अक्षय आणि त्या महिला दाखवल्या गेल्या आहेत, हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आहे या प्रकरणी अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
पहा व्हिडीओ
दरम्यान, या प्रकरणी अक्षय कुमारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र वेळ आल्यास त्याला इतिहासप्रेमी वर्गासाठी झुकून माफी मागावी लागते की ही बाब मींम्स, ट्रोलिंग करताना बाजूला सरून जाते हे पाहणे महत्वाचे आहे.