Jiah Khan Death Case: जिया खान मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणारी जिया खान (Jiah Khan) ची आई राबिया खान (Rabiah Khan) यांनी दाखल केलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 2013 मध्ये जिया खानच्या मृत्यूबाबत राबिया खानची फौजदारी रिट याचिका फेटाळताना, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील खानच्या दृष्टिकोनाबद्दल अतिशय कडक टिप्पणी केली.
सीबीआयने केलेल्या तपासावर आपण समाधानी असल्याचं म्हणत हायकोर्टाने म्हटले आहे की, "सीबीआयने केलेल्या पुढील तपासावर न्यायालय निःसंशयपणे समाधानी आहे आणि याचिकाकर्त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 216 आणि 319 मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी फौजदारी न्यायालयाच्या योग्य अधिकारांचा वापर करण्यापासून काहीही प्रतिबंधित करणार नाही." (हेही वाचा - Arrest Warrant Against Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरच्या अडचणीमध्ये वाढ; न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी, जाणून घ्या कारण)
याचिकाकर्त्याच्या वर्तनावर हायकोर्टाने उपस्थित केला प्रश्न -
हायकोर्टाने याचिकाकर्त्याच्या वागणुकीवरही प्रश्न उपस्थित केले असून त्यामुळे खटला लांबणीवर पडल्याचं म्हटलं आहे. हायकोर्टाने असेही म्हटले आहे की, "याचिकाकर्त्याच्या वागणुकीमुळे खटला अनावश्यकपणे लांबणीवर पडला, जो अद्याप सुरू झाला नाही. जलद न्याय हा प्रत्येक व्यक्तीचा, आरोपी आणि पीडित दोघांचा घटनात्मक अधिकार असल्याने, फौजदारी रिट याचिका फेटाळण्यात आली."
"याचिकाकर्त्याने आपल्या देशाच्या गुन्हेगारी न्याय प्रणाली आणि तपास यंत्रणांबद्दल उघडपणे शंका व्यक्त केली. म्हणूनच आम्हाला ते हाताळणे आवश्यक आहे," असेही उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. कोर्टाने यूके स्थित लॉ फर्म स्कार्मन्सचाही उल्लेख केला.