Raj Thackeray, Panipat Poster (Photo Credits: Twitter)

Panipat Movie Review By Raj Thackeray: पानिपत च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ अखेर उद्या म्हणजेच 6 डिसेंबर रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूर, क्रिती सनॉन आणि संजय दत्त अशी दमदार स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत लढाईतील भव्यदिव्यता व व्हिजुअल इफेक्ट्सने सिनेमाला ग्रँड बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच, महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

या ट्विटमध्ये राज यांनी चित्रपटाचं कौतुक करताना लिहिलं की, 'पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा.'

इतकंच नव्हे तर सिनेमाचं ट्रेलर जेव्हा प्रदर्शित करण्यात आला होता, तेव्हा देखील राज यांनी चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आणि आता लिहिलेल्या ट्विटमध्ये त्यांनी खुद्द आशुतोष गोवारीकर यांना टॅग केलं आहे.

पानिपत चित्रपट प्रदर्शित करू नये, शिंदे सरकारकडून याचिका दाखल; 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडणार सुनावणी

दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलर नंतर सोशल मीडियावर अर्जुन कपूरला मात्र ट्रोलला सामोरे जावे लागले आहे. परंतु, अर्जुनने त्याच्या पात्राला किती न्याय दिला आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.