Sukesh Chandrashekhar (PC - Twitter/ @4pmnews_network)

Sukesh Chandrashekhar Chargesheet: सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) यांच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेत्रीने या प्रकरणी न्यायालयात स्वत:चा जबाब नोंदवला आहे. अभिनेत्रीने सांगितेल की, मे 2018 मध्ये जेव्हा ती सुकेश चंद्रशेखरला भेटल्यानंतर तिहार तुरुंगातून बाहेर आली तेव्हा बीएमडब्ल्यू कारमधून पिंकी इराणी (Pinky Irani) ने तिच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल फेकले.

अभिनेत्रीने असेही सांगितले की चंद्रशेखरची सहकारी इराणी उर्फ ​​एंजल हिने तिच्यासाठी IGI विमानतळावर गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट विकत घेतला होता आणि तिला शॉर्ट्समध्ये बदलण्यास सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा तुरुंगात प्रवेश केल्यानंतर ती रडू लागली, तेव्हा इराणीने तिला 'काहीही होणार नाही' असे वारंवार सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिचा चेहरा दिसणार नाही म्हणून इराणीने तिला डोके खाली ठेवण्यास सांगितले. (हेही वाचा - Sukesh Chandrashekhar विरोधात Jacqueline Fernandez ने नोंदवला जबाब; म्हणाली, 'त्याने माझे आयुष्य नरक बनवलं')

अभिनेत्रीने सुकेशचे अनेक रहस्य केले उघड -

निवेदनाचा हवाला देत आरोपपत्रात म्हटले आहे की, "तिहार येथे आम्हाला एका खोलीत नेण्यात आले, ज्यामध्ये अनेक उपकरणे होते. तेवढ्यात एक व्यक्ती खोलीत आली आणि मला सांगण्यात आले की तो सुकेश चंद्रशेखर आहे. त्याने ब्रँडेड कपडे आणि घड्याळ घातले होते. त्याने स्वत:ची ओळख शेखर रेड्डी अशी करून दिली. इराणी यांनी मला सांगितले की तो सन टीव्हीचा मालक आणि जयललिता यांचा पुतण्या आहे आणि मतदान यंत्रे हॅक केल्याप्रकरणी तुरुंगात आहे."

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी सर्वांसमोर त्याच्यावर ओरडले की त्याने मला भेटण्यासाठी तिहार तुरुंगात का बोलावले. त्याने मला सांगितले की, त्याचा माझ्यावर क्रश आहे. मी त्याला सांगितले की. माझ्या लग्नामुळे मला दोन मुले आहेत आणि माझे एक मूल सहा महिन्यांचे आहे. "

अभिनेत्री पुढे म्हणाली की, चंद्रशेखरने तिला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या ज्या कोणालाच माहित नव्हत्या. ती म्हणाली, "मग सुकेशने मला मिठी मारली आणि चुंबन घेतले, पण मी खोलीतून बाहेर पडले. मी तिहारमधून बाहेर आल्यानंतर एंजलने मला 2 लाख रुपये दिले. त्याने त्याचे घड्याळही काढून मला दिले. त्याचा शेवटचा कॉल आला 23.12.2018 ला आला होता." अभिनेत्रीने न्यायालयात सांगितले की, मुंबईत परतल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून 8 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अभिनेत्रीच्या वक्तव्याच्या आधारे दिल्ली पोलिसांना चंद्रशेखरने तिला फसवल्याचा संशय आहे.