Gully Boy स्टार Siddhant Chaturvedi ची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह; घरातचं केलं स्वत: ला क्वारंटाइन
सिद्धांत चतुर्वेदी (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) चा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे. त्यानंतर अभिनेताने स्वत: ला क्वारंटाइन (Quarantine) केले आहे. अलीकडे रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, संजय लीला भन्साळी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय अभिनेत्री तारा सुतारियालादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.

सिद्धांतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, "तुमच्या चिंतेबद्दल धन्यवाद. मी कोविड- 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सध्या माझी प्रकृती ठिक आहे. मी स्वत: ला घरात क्वारंटाइन केलं आहे. मी सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. मी कोरोनाचा सकारात्मकतेने सामना करत आहे. " (वाचा - Tara Sutaria Tested COVID19 Positive: तारा सुतारिया हिला कोरोनाची लागण, नुकतेच पूर्ण केले होते 'तड़प' चित्रपटाचे शुटिंग)

सिद्धांत चतुर्वेदी इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credits: Instagram)

सिद्धांत राजस्थानात आपल्या ‘फोन बूथ’ चित्रपटासाठी शुटिंग करत होता. गेल्या महिन्यात तो आपल्या 'फोन बूथ' स्टार कतरिना कैफबरोबर बॅडमिंटन खेळताना दिसला होता. सिद्धांत शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांच्यासोबत काम करत आहे.

याशिवाय तो रवि उद्यावर यांच्या ‘युध्रा’ चित्रपटात मालवीका मोहनन आणि राघव जुयाल यांच्यासमवेत दिसणार आहे. तसेच, 'बंटी बबली' चित्रपटातही सिद्धांतला कास्ट करण्यात आलं आहे.