रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा Gully Boy, 2020 च्या ऑस्कर स्पर्धेतून बाहेर; वाचा सविस्तर
Gully Boy (Photo Credits: File Image)

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनित ‘गली बॉय’ (Gully Boy) हा सिनेमा यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. जोया अख्तर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते ज्याचे प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही कौतुक झाले. हा चित्रपट काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला कारण सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट विभागात ‘गली बॉय’ ची ऑस्करसाठी (Gully Boy- official Oscar entry) भारताकडून अधिकृत निवड झाली होती. यासंबंधित घोषणा होताच चित्रपटाची संपूर्ण टीम खुश झाली होती. रणवीर, आलिया आणि टीम मधील इतर सदस्यांनी यापूर्वी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून आनंद व्यक्त केला होता.

पण असे दिसते की हा चित्रपट 'द अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' या संस्थेवर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. 92 व्या अकादमी पुरस्कारासाठी नऊ विभागातील अंतिम शॉर्टलिस्ट केलेली चित्रपटांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात डॉक्युमेंटरी फीचर, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप अँड केशरचना, संगीत (मूळ स्कोअर), संगीत (मूळ गाणे), अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म आणि व्हिज्युअल इफेक्ट यांचा समावेश आहे.

परंतु दुर्दैवाने, ‘गली बॉय’ या यादीमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यास अपयशी ठरला आहे. ऑस्करने शॉर्टलिस्ट केलेल्या यादीनुसार, यापुढे हा चित्रपट या शर्यतीचा भाग नसणार आहे कारण निवडलेल्या 10 चित्रपटांच्या यादीमध्ये 'गली बॉय' चं नाव देण्यात आलेलं नाही .

दरम्यान, Czech The Painted Bird (Czech Republic), Les Misérables (France), Atlantics (Senegal) आणि इतर चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मच्या विभागात पाहायला मिळाले.