अभिनेता गोविंदा याचा पुतण्या जन्मेंद्र अहुजाचा मृत्यू; राहत्या घरी सापडला मृतदेह
Govinda's nephew Janmendra Ahuja (Photo Credits: Instagram)

अभिनेता गोविंदा (Govinda) याचा पुतण्या जन्मेंद्र अहुजा (Janmednra Ahuja) याचा वर्सोवा (Versova) येथील राहत्या घरी मृतदेह सापडला आहे. जन्मेंद्र याला गोविंदाचा भाऊ किर्ती कुमार (Kirtikumar) यांनी दत्तक घेतले होते. किर्ती कुमार हे अभिनेते-दिग्दर्शक आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूसमयी जन्मेंद्र 34 वर्षांच्या होता. मृत्यूनंतर वर्सोवा येथील हॉस्पिटलमध्ये मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता.

जन्मेंद्रचा आतेभाऊ अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हा नैसर्गिक मृत्यू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जन्मेंद्रलाही सिनेमा निर्माता म्हणून करिअर करायचे होते. मात्र आता पर्यंत त्याला 'जहाँ जायेगा हमे पायेगा' (Jahaan Jaaeyega Humein Paayaega) केवळ हा एकच सिनेमा निर्मितीत यश आले होते. तसंच जन्मेंद्र याने 'प्यार दिवाना होता है' या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते.

janmendra-ahuja-1
जन्मेंद्र अहुजा गोविंदा आणि कुटुंबियांसोबत (Photo Credits: Janmendra Ahuja, Facebook)

2006 मध्ये जन्मेंद्र याला त्याच्या चार मित्रांसह पोलिसांनी एका महिलेचा विनयभंग आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र जन्मेंद्र याच्या वडिलांनी विनयभंगाचा आरोप फेटाळून लावला होता.