कैफी आझमी यांची 101 वी जयंती: उर्दू कवी, गीतकाराला गूगलची खास डूडलच्या माध्यमातून आदरांजली
Kaifi Azmi Google Doodle (Photo Credits: Google)

विसाव्या शतकातील श्रेष्ठ उर्दू साहित्यिक, कवी, गायक कैफ कैफी आझमी (Kaifi Azmi) यांच्या 101 जयंतीनिमित्त (Kaifi Azmi 101st Birthday) गुगलने खास डूडल (Google Doodle)  साकारून अभिवादन केले आहे. कैफ आझमी यांनी विसाव्या शतकात प्रेमावर आधारित अनेक कविता तसेच पटकथा लिहल्या. कैफ आझमी यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील आजमगढ येथे झाला. विशेष म्हणजे आजमी यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. त्यावेळी त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या 1942 च्या भारत छोडो आंदोलनाचा प्रभाव पडला होता.

कैफी आझमी मुंबईमध्ये एका उर्दू वर्तमान पत्रासाठी लिखाण करत होते. 1943 मध्ये त्यांचा 'झंकार' हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. आझमी Progressive Writers Association चे सदस्य होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विषयावर भाष्य केले. त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आझमी यांना 3 फिल्मफेयर अवार्ड, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे पद्म श्री पुरस्कार मिळाला होता.(हेही वाचा - Chandramukhi Poster Out: प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ अवतरणार रुपेरी पडद्यावर)

Kaifi Azmi Google Doodle (Photo Credits: Google)
संवेदनशील अभिनेत्री शबाना आझमी या कैफी आझमी यांच्या कन्या आहेत. विसाव्या शतकातील उर्दू भाषेतील एक श्रेष्ठ कवी-शायर म्हणून कैफी आझमी यांचे नाव रसिकांच्या मनावर कोरले गेले आहे. प्रगतिशील लेखक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ, 'इप्टा' म्हणजेच राष्ट्रीय जन नाट्य मंचाचे अध्यक्ष, क्रांतिकारी शायर म्हणूनही ते भारतीय साहित्यात प्रसिद्ध आहेत. स्त्री-पुरुष समानता, कामगार व शेतकऱ्यांबदल अपार करुणा, समाजवादी विचारांचा आग्रह अशा विचाराने भारलेली कैफी यांची शायरी रसिक मनावर भूरळ घालणारी आहे.