Forbes Highest-Paid Actors of 2020: फोर्ब्सच्या जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षय कुमारने पटकावले 6 वे स्थान; Will Smith व Jackie Chan यांना टाकले मागे (See List)
Akshay Kumar, Dwayne Johnson, Ryan Reynolds (Photo Credits: Twitter)

फोर्ब्सची (Forbes) सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 पुरुष सेलेब्जची यादी (Highest-Paid Actors of 2020) समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) हा एकमेव बॉलीवूड अभिनेता आहे ज्याने या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 48.5 मिलियन डॉलर (362 कोटी) कमाई करून तो या यादीत सहाव्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, या यादीतील बहुतेक कलाकारांचे उत्पन्न एंडोसेर्मंटमुळे झाले आहे. त्याचवेळी एंडोसेरमेंटच्या बाबतीत अक्षय कुमारही मागे नाही. सोबतच अक्षय कुमार एका वर्षात अनेक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. सध्याही त्याचे बरेच चित्रपट अद्याप पाइपलाइनमध्ये आहेत.

या यादीमध्ये ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) पहिल्या स्थानावर आहे, ज्याला 'द रॉक' म्हणूनही ओळखले जाते. त्याने 1 जून 2019 ते 1 जून 2020 या कालावधीत 87.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. यात फिल्म थ्रीलर रेड नोटिसमधून नेटफ्लिक्स इंकद्वारे मिळवलेल्या 23.5 मिलियन डॉलरचा समावेश आहे. त्याने आपल्या अंडर आर्मर इंक प्रकल्प रॉक फिटनेस वियर लाइनमधूनही पैसे मिळवले आहेत.

रेड नोटिसमध्ये जॉनसनसोबत को-स्टार असलेला रायन रेनॉल्ड्स (Ryan Reynolds), हा फोर्ब्स रँकिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्या चित्रपमधून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स तसेच नेटफ्लिक्स चित्रपट सिक्स अंडरग्राऊंडमधून 20 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. एका वर्षाच्या कालावधीत त्याने 71.5 मिलियन डॉलर्सची कमाई केली असल्याचे मासिकाने म्हटले आहे.

नेटफ्लिक्सच्या एक्शन कॉमेडी स्पेंसर कॉन्फिडेंशियलचा स्टार अभिनेता आणि निर्माता मार्क वहलबर्ग (Mark Wahlberg) 58 मिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. अभिनेता बेन अफेलेक (Ben Affleck) 55  दशलक्ष डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आणि विन डिझेल  (Vin Diesel) 54 दशलक्ष डॉलर्ससह पाचव्या स्थानी आहे. अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावर असून, हॅमिल्टनचा निर्माता लिन-मॅनुअल मिरांडा, अभिनेता विल स्मिथ, अ‍ॅडम सँडलर आणि मार्शल आर्ट्स स्टार जॅकी चॅन यांचा पहिल्या 10 मध्ये समावेश आहे. (हेही वाचा: अभिनेता Dwayne Johnson ठरला इंस्टाग्राम वरील सर्वात श्रीमंत सेलेब्रिटी; यादीमध्ये विराट कोहली, प्रियंका चोप्रा यांचा समावेश, जाणून घ्या त्यांची कमाई)

फोर्ब्सने सांगितले की, हे आकडे कलाकारांचा कर भरण्यापूर्वीचे आहेत. एजंट्स, मॅनेजर आणि वकिलांना भरलेल्या शुल्काची आकडेवारीत कोणतीही कपात समाविष्ट नाही. मासिकाने जास्त उत्पन्न असलेल्या अभिनेत्रींची स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, अक्षय कुमार सध्या यूकेमध्ये बेल बॉटमसाठी शूटिंग करत आहे. अक्षयचे लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, पृथ्वीराज, अतरंगी रे हे चित्रपट रिलीज होणार आहेत.