Forbes Top 100 Richest Indians: फोर्ब्सने जाहीर केली भारतातील 100 श्रीमंतांची यादी; गौतम अदानी आणि मुकेश अंबानी अव्वल स्थानावर कायम, Nykaa च्या फाल्गुनी नायर यांचाही यादीत समावेश
Gautam Adani, Mukesh Ambani, Falguni Nayar (PC- PTI and FB)

Forbes Top 100 Richest Indians: जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने 2022 या वर्षासाठी भारतातील 100 श्रीमंतांची यादी (India's 100 Richest People) केली आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) पहिल्या क्रमांकावर आहेत, तर उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत अशा लोकांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांच्या संपत्तीत एका वर्षात 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या यादीत नायकाच्या फाल्गुनी नायर (Falguni Nair) यांचाही समावेश आहे, ज्याचा या यादीत 44 व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे. नायर यांना या यादीत प्रथमच स्थान मिळाले आहे.

ब्युटी स्टार्टअप 'नायका' ची संस्थापक फाल्गुनी नायर यांनी स्वतःसाठी एक स्थान तयार केलं आहे. त्या सध्या भारतातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला अब्जाधीश आहे. स्टार्टअपच्या जगात येण्यापूर्वी फाल्गुनी एक इन्व्हेस्टमेंट बँकर होती. त्यांनी प्रतिष्ठित IIM अहमदाबादमधून पदवी प्राप्त केली आहे. (हेही वाचा - Mukesh Ambani Buys Villa in Dubai: मुकेश अंबानी यांनी दुबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून उडेल तुमची झोप)

फाल्गुनी नायर यांनी कोटक महिंद्रा बँकेत सुमारे 18 वर्षे सेवा केली होती. या बँकेत त्या संचालक पदावर होत्या. परंतु 2012 मध्ये त्यांनी 'नायका' कंपनी सुरू केली, या कंपनीने लवकरच सौंदर्य बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली. आज Nykaa कडे 4000 हून अधिक सौंदर्य, वैयक्तिक काळजी आणि फॅशन ब्रँड आहेत.

भारतातील श्रीमंतांमध्ये या लोकांचा समावेश -

रेखा झुनझुनवाला: राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या यादीत 30 व्या स्थानावर आहे.

नेहल वकील: एशियन पेंट्स चालवणाऱ्या कुटुंबाची तिसरी पिढी असलेल्या नेहललाही या यादीत प्रथमच स्थान मिळाले आहे.

वेणू श्रीनिवासन: जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या TVS समूहाच्या वेणू श्रीनिवासन यांचाही यावर्षीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

रवी मोदी: मन्यावर ब्रँडसाठी ओळखले जाणारे भारतीय एथनिक वेअर मेकर रवी मोदी यांनीही प्रथमच या यादीत स्थान मिळवले आहे.

गौतम अदानी -

फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार, अदानी समूहाच्या अध्यक्षांची एकूण संपत्ती 1,211,460.11 कोटी रुपये आहे. या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - No-Poaching Agreement: गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यात महत्त्वपूर्ण करार; एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या नाहीत नोकऱ्या)

मुकेश अंबानी -

फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 710,723.26 कोटी रुपये आहे, ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.