Cirkus First Look: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. अनेकांची शूटिंग सुरू असून अनेक रिलीजसाठी सज्ज आहेत. दरम्यान, रणवीर सिंग (Ranveer Singh) चा आगामी चित्रपट चर्चेत आला आहे. इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार्संनी भरलेला हा रोहित शेट्टीचा चित्रपट असून त्याचे शीर्षक 'सर्कस' (Cirkus) असं आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा फर्स्ट लूक आज रिलीज झाला असून तो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सर्कसच्या मोशन पोस्टरमध्ये रणवीर सिंग व्यतिरिक्त या चित्रपटातील अनेक कलाकारांचे लूक पाहायला मिळत आहेत. नुकताच रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्कस चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये रणवीर सिंगसोबत पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर आणि संजय मिश्रा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. (हेही वाचा - Deepika-Ranveer New House: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल; 'इतकी' आहे किंमत)
या चित्रपटात अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांनी स्पेशल अपिअरन्स दिल्याचे सांगितले जात आहे. या फर्स्ट लूकमध्ये 'आम्ही या ख्रिसमसमध्ये तुमच्या कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी आलो आहोत' असे लिहिले आहे. हे मोशन पोस्टर शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले- 'पुढच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर येण्यापूर्वी आमच्या सर्कसच्या या कुटुंबाला भेटा!!!' (हेही वाचा - Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट-रणबीर कपूर ने आपल्या मुलीचं ठेवलं 'हे' नाव: अभिनेत्रीने पोस्ट शेअर सांगितला नावाचा अर्थ)
View this post on Instagram
रोहित शेट्टी या चित्रपटाचा निर्माता असून त्यानेचं या चित्रपटाचे दिग्दर्शक केलं आहे. पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असणार आहे.