तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांच्या फार्महाऊसला भीषण आग; बीग बी शूटिंग करणार असलेल्या सिनेमाच्या सेटचे 2 कोटींचे नुकसान (Watch Video)
Chiranjeevi’s Farmhouse Gutted in Fire (Photo Credits: File Photo)

तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्या फार्महाऊसला शुक्रवारी (3 मे) आग लागली असून त्यात सिनेमाच्या सेटचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हैद्राबाद येथील कोकपेट गावात चिरंजीवी यांचे फार्महाऊस आहे. त्याच भागात 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' (Sye Raa Narasimha Reddy) सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. या सिनेमाच्या सेटचं जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून ते आजपासून शूटिंगला सुरुवात करणार होते. मात्र आगीच्या दुर्घटनेमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ:

उदयलावा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित 'स्ये रा नरसिम्हा रेड्डी' हा ऐतिहासिक युद्धपट आहे. तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये बनविल्या जात असलेल्या या सिनेमात चिरंजीवी, अमिताभ बच्चन, नयनतारा, तमन्ना आणि इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चिरंजीवीचा मुलगा आणि लोकप्रिय अभिनेता राम चरण यांनी सिनेमाची निर्मिती केली असून सुरेंद्र रेड्डी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.