Rashmika-Mandanna | File Image

Rashmika Mandanna's Deepfake Video: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandanna) डीपफेक व्हिडिओच्या (Deepfake Video) संदर्भात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 465 आणि 469 (प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या हेतूने खोटे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C आणि 66E अंतर्गत एफआयआर नोंदवला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथके तयार करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने या व्हिडिओच्या संदर्भात शहर पोलिसांना नोटीस पाठवून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा -Deepfake Row: डीपफेक व्हिडिओबाबत सरकारचे कठोर पाऊल; दोषी आढळल्यास होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड)

रश्मिकाच्या बनावट व्हायरल व्हिडिओवरील मीडिया रिपोर्ट्सची त्वरित दखल घेण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयोगाने (DCW) या संदर्भात दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. DCW ने दिल्ली पोलिसांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, अभिनेत्रीने या प्रकरणी तिची चिंता देखील व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये कोणीतरी तिच्या फोटोशी बेकायदेशीरपणे छेडछाड केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आयोगाला मिळाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

डीपफेक हे एक डिजिटल तंत्र आहे, ज्याच्या अंतर्गत AI वापरून, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिमेसह सहजपणे बदलली जाऊ शकते. रश्मिकाच्या बाबतीतही असेच घडले. झारा पटेल नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने एका व्हिडिओमध्ये रश्मिकाचा चेहरा एडिट करून तिच्या जागी बदलला होता. हा व्हिडिओ इतका स्पष्टपणे संपादित करण्यात आला होता की खरा आणि खोटा यात फरक करणे खूप कठीण होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तो X वर शेअर केला होता, त्यानंतर रश्मिकासह सर्व स्टार्सनी चिंता व्यक्त केली होती.