FIR Against Google CEO: गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या विरोधात प्रोड्यूसर-डायरेक्टर सुनील दर्शन यांची एफआयआर
FIR Against Google CEO | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, सनी देओल यांच्यासोबत 'इंतकाम', 'लुटेरे', 'जानवर' यांच्यासारखे चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सूनील दर्शन (Suneel Darshan) यांनी गूगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्यासह त यूट्यूब और गूगल (FIR Against Google CEO) च्या सहा अधिकाऱ्यांविरोधात मुंबई येथे FIR दाखल केला आहे. कॉपिराईट उल्लंघन केल्यासंदर्भात ही तक्रार 25 जानेवारी रोजी दाखल करण्यात आली आहे. Suneel Darshan यांनी म्हटले आहे की, युट्यूब प्रदीर्घ काळापासून दर्शन यांच्या चित्रपट आणि संगिताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. 2017 मध्ये सुनील दर्शन यांची 'एक हसीना थी एक दीवाना था' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह साह लोकरांविरोधात दाखल केलेल्या एफआयआर बद्दल बोलताना सुनील दर्शन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेकी, पाठिमागील 11 वर्षांपासून ते ही लढाई लढत आहेत. मी सरकारपासून गूगल आणि यूट्युब पर्यंत अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रं लिहिली. अनेक बाबी त्यांच्या ध्यानात आणून दिल्या. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तरीही कोणी उत्तर द्यायला, जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. माझी तक्रार दाखल करुन घ्यायलाही कोणी तयार नव्हते. अखेर मी न्यायालयाचा दरवाचा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानुसार, एफआयआर दाखल करुन घेतली. (हेही वाचा, Google CEO सुंदर पिचाई यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? घ्या जाणून)

सुनील दर्शन यांनी पुढे म्हटले की, पाठीमागील काही काळापासून ते केवळ हीच लढाई लढत आहेत. आगोदर ते वर्षातून दोन चित्रपट बनवत असत. मात्र, आता मी विचार करतो आहे की, जर आपण बनविलेल्या कलाकृतीचा फायदा जर दुसऱ्यांना होणार असेल तर आगोदर हीच लढाई का लढू नये?. दरम्यान, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना भारत सरकारने पद्म भूषण सन्मान देऊन गौरविण्याची घोषणा केलीआहे. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.