चित्रपट निर्माते संजय गढवी (Filmmaker Sanjay Gadhvi ) यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. मुंबई येथील राहत्या घरी रविवारी (19 नोव्हेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वत्तात, संजय यांच्या निधनाबद्दल त्यांची कन्या संजिना गढवी यांनी माहिती दिल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे असे की, तीन दिवसांपूर्वीच संजय यांनी आपला 57 वा वढदिवस साजरा केला होता. बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट घेऊन त्यांनी 'धूम' चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर या चित्रपटाचे अनेक सिक्वेलही त्यांनी काढले होते. हा चित्रपट आणि त्यापुढचे सर्वच सिक्वेल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ज्याची रसिकांमध्ये आजही चर्चा असते. दरम्यान, त्याच्या अंत्यसंस्काराबद्दल अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
संजय गढवी हे धूम, धूम-2, मेरे यार की शादी है, किडनॅप या चित्रपटांसठी प्रामुख्याने ओळखले जातात. धूम चित्रपटामध्ये त्यांनी बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट घेतली होती. ज्यामध्ये हृतिक रोशन, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, बिपाशा बासू आणि इतरही अनेक बडे कलाकार होते. पहिल्यांदा आलेला धूम आणि त्यानंतर धूम-2 सह आलेला सिक्वेल असे सर्वच चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले.
एक्स पोस्ट
The magic he created on screen will be cherished forever. May his soul rest in peace. #SanjayGadhvi pic.twitter.com/1wstfQZpFO
— Yash Raj Films (@yrf) November 19, 2023
दरम्यान, धूम, धमू-2 या चित्रपटांसोबतच गढवी यांनी 'मेरे यार की शादी है' आणि इम्रान खान स्टारर 'किडनॅप' यांसारखे काही हटके चित्रपटही दिले. सन 2012 मध्ये आलेल्या 'अजब गजब लव्ह' आणि 2020 मध्ये 'ऑपरेशन परिंदे' या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांनी 'तेरे लिए' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, 2004 मध्ये आलेल्या 'धूम' चित्रपटामुळे ते सर्वाधिक चर्चेत आले. संजय गढवी हे गुजराती लोकसाहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मनुभाई गढवी यांचे चिरंजीव होत. त्यांचे बालपण मुंबईतील पेडर रोडवरील पहिल्या 14 मजल्यांच्या गगनचुंबी इमारतीत गेले. लहानपणी त्यांनी कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.