‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’ चित्रपटाचे दिग्दर्शन बासू चटर्जी यांचे वृद्धापकाळाने निधन
Filmmaker Basu Chatterjee (PC- Wikipedia)

दिग्दर्शन बासू चटर्जी (Basu Chatterjee) यांचे आज सकाळी मुंबईत (Mumbai) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. बासू चॅटर्जी यांनी 'छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. बासू चटर्जी यांच्यावर दुपारी 2 वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हलकेफुलके विनोद आणि साधेपणा हे बासू चटर्जी यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. चटर्जी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला, चमेली की शादी, आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. (हेही वाचा - Happy Birthday Ashok Saraf: 'अशी ही बनवाबनवी', 'गुपचूप गुपचूप'... पहा अशोक सराफ यांच्या सिनेमातील धम्माल विनोदी सीन्स (Watch Video))

बासू चटर्जी यांनी हिंदी, बंगाली तसेच मालिकांचेदेखील दिग्दर्शिन केले. बासू यांचा जन्म 30 जानेवारी 1930 रोजी अजमेर येथे झाला. बासू यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.