'मैं मुलायम सिंह यादव' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
'मैं मुलायम सिंह यादव' चित्रपटाचा टिझर (Image Credit: Instagram)

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या जीवनावर आधारित 'मैं मुलायम सिंह यादव' (Main Mulayam Singh Yadav) या चित्रपटाचा टिझर (Official teaser) प्रदर्शित झाला आहे. या टिझरमधील एका दुश्यात कुस्ती दाखवण्यात आली असून त्यात मुलायम सिंह यांची भूमिका निभावणाऱ्या अमित सेठी यांची झलक पाहायला मिळत आहे. यात पहिलवानांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात मुलायम सिंह यांच्या कोणत्या गोष्टीवर जास्त भर टाकण्यात येणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, निर्मात्याने सांगितलं आहे की, हा चित्रपट एका शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट आहे. हा मुलगा राज्यातील सर्वोच्च नेता कसा बनतो, हे या चित्रपटातून सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुवेंदु राज घोष यांनी केलं आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस वरील शॉर्ट फिल्म मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, प्रियंका चोप्रा यांच्या समवेत झळकणार अनेक सेलिब्रिटी; जाणून घ्या कुठे, कधी पाहाल ही फिल्म (Watch Video))

'मैं मुलायम सिंह यादव' या चित्रपटात अमित सेठी यांच्यासह मिमोह चक्रवर्ती, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, सुप्रिया कार्निक, सयाजी शिंदे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिका बजावणार आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. देशात कोरोनाचं सावट संपल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.