Suraj Pe Mangal Bhari चित्रपटातील 'लड़की ड्रामेबाज है' गाण्यात दिसला फातिमा सना शेख चा हॉट अंदाज; दिलजीत दोसांझचीही दिसली झलक (See Video)
फातिमा सना शेख आणि दिलजीत दोसांझ (Photo Credits: Instagram)

Suraj Pe Mangal Bhari New Song Ladki Dramebaaz Hai: 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'लड़की ड्रामेबाज है' या बहुप्रतिक्षित गाणे रिलीज केले आहे. या गाण्यावर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) एकत्र दिसत आहेत. या ट्रॅकमध्ये आपल्याला फातिमाच्या रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्यात फातिमाची दिलजितबरोबरची केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळत आहे. लडकी ड्रामेबाज नावाच्या या गाण्यात फातिमाचा प्रवास आणि तिचे पात्र एका सुंदर पद्धतीने सादर करण्यात आले आहे. यात तिची आणि दिलजीतची अप्रतिम रोमँटिक केमिस्ट्री आहे.

या गाण्यात फातिमा शेखकडे पाहिले तर ती एक सरळ घरगुती मुलगी आहे, जी आपल्या सौंदर्य आणि साधेपणाने सहज लोकांच्या हृदयात स्थान मिळवते. तसेच दिलजीत दोसांझकडे एक नजर टाकल्यास तो लोकांच्या मनावर राज्य करत असल्याचं दिसून येत आहे. (हेही वाचा - बिग बॉस फेम Shehnaaz Gill चे वडील Santokh Singh यांनी घेतली शपथ-'मुलीसोबत आयुष्यभर बोलणार नाही', जाणून घ्या कारण )

या चित्रपटात मनोज बाजपेयी (Manoj Bapayee) यांनीही मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं असून हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.