मनुषी छिल्लर हिला फराह खान बॉलिवूडमध्ये आणणार?
Manushi Chhillar (Photo Credits- Instagram)

भारताच्या मनुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिने आपल्या सौंदर्याची जादू दाखवत ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर नाव कोरले आहे. चीनमधील सनाया येथे आयोजित ‘मिस वर्ल्ड’ (Miss World) स्पर्धेमध्ये हिंदुस्थानची ‘मिस इंडिया’ (Miss India) स्पर्धा जिंकणाऱ्या मनुषी छिल्लरला ‘मिस वर्ल्ड-२०१७’ घोषित करण्यात आले. त्यानंतर आता मनुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये एक डेब्यू चित्रपटातून झळकण्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) मनुषीला बॉलिवूडमध्ये आणणार असल्याचे सांगितले जात आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, दिया मिर्जा आणि प्रियांका चोप्रा यांनी ब्युटी क्विनचा पुस्कार जिंकल्यानंतर आता मनुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार झाली आहे. फराह खान हिच्या जवळच्या सूत्रांनी असे सांगितले की, फराह आणि मनुषी यांच्यामध्ये एक भेटगाठ झाली आहे. अद्याप या दोघांच्या गाठीभेटी बद्दल सांगितले जात नाही आहे. यापूर्वी फराह हिचा 'ओम शांति ओम' (Om Shanti Om) या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने डेब्यू केला होता.

2014 रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट 'हॅप्पी न्यु ईअर' (Happy New Year) या चित्रपटानंतर फराहाने कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. परंतु काही चित्रपटातून नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे.