Aur Pyaar Karna Hai Song Released: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ आणि पंजाबी गायक गुरु रंधावा यांचं 'और प्यार करना है' गाणं रिलीज; Watch Video
Aur Pyaar Karna Hai Song (PC- You Tube)

Aur Pyaar Karna Hai Song Released: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि पंजाबी गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. नेहाच्या या गाण्यात गुरु रंधावा ने एक रोमँटिक ट्रॅक गायला आहे. या जोडीचे 'और प्यार करना है' (Aur Pyaar Karna Hai) गाणे रिलीज होताच यूट्यूबवर धमाका झाला आहे. प्रेक्षकांना गाण्यातील दोघांची जोडी चांगलीच पसंत पडली आहे. थोडक्यात गायकांची ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. या गाण्यात गुरु रंधावा आणि नेहा कक्कड़ प्रथमच एकत्र दिसले आहेत. भूषण कुमारच्या टी-सीरीजने हे गाणे प्रसिद्ध केले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर ट्रेंड होत आहे.

नेहा कक्कर आणि गुरु रंधावा यांच्या 'और प्यार करना है' या गाण्यातून अचानक या दोघांचं प्रेम कसं अडचणीत येऊ लागलं हे दाखवण्यात आलं आहे. यामुळे, दोघेही विभक्त होतात. जिथे गाण्यात गुरू आधीच मरण पावला आहे आणि नेहा त्याला आठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी नेहाचा मृत्यूही होतो. यानंतर दोघांचे आत्मा एकमेकांना भेटतात. (वाचा -Nadiyon Paar Song Released: Roohi चित्रपटातील ‘नदियों पार’ गाणं प्रदर्शित; पहा Janhvi Kapoor ची घायाळ करणारी अदा)

नेहा कक्कर आणि गुरु रंधावा यांनी हे गाणे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. हे गाणं सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. गाण्यांचे बोल सईद कादरी यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन सचेत परमपरा यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

नेहा कक्कड़ आणि गुरु रंधावा दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. हे दोघेही त्यांची नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसाठी शेअर करत असतात. तसेच त्यांचे चाहते देखील त्यांच्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात.