Dilip Kumar With Brother Ahsan and Aslam (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar)  यांचा लहान भाऊ एहसान खान (Ehsan Khan)यांचा देखील कोरोना सोबत लढताना दुर्देवी मृत्यू झाला आहे. बुधवार (2 सप्टेंबर) च्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते 92 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागाण झाल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल केले होते. मात्र त्यांची कोरोना विरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे.

21 ऑगस्ट दिवशी दिलीप कुमारचे बंधू असलम खान आणि त्या पाठोपाठ आता एहसान खान यांचे निधन झाले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लीलावतीचे डॉक्टर जलील पारकर यांनी त्यांच्या निधनाची बातमीदेताना एहसान खान यांना अल्झायमर आणि उच्च रक्त दाबा सोबतच हृद्य विकार देखील असल्याचे सांगितले. Dilip Kumar Younger Brother Aslam Khan Dies : अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे कोविड 19 शी झुंजताना निधन.

ANI Tweet

एहसान आणि अस्लम खान या दोघांनाही काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास, ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. महाराष्ट्रात कोरोनाची कुणकुण लागताच एप्रिल महिन्यात अभिनेते दिलीप कुमार यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.