Durgamati Trailer: भूमि पेडनेकर च्या 'दुर्गामती' सिनेमाचा ट्रेलर आऊट; भीती, सूड यांनी भरलेला रोमांचक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Durgamati Film Poster (Image Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या प्रॉडक्शनची निर्मिती असलेला दुर्गामती: द मिथ (Durgamati: The Myth) सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात भूमि पेडनेकर (Bhumi Pednekar) प्रमुख भूमिकेत दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचे पोस्टर समोर आले. त्यात भूमि चा भयानक लूक समोर आला. त्यानंतर प्रेक्षकांमध्येही या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली. त्यात आता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यात भूमि चा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे.

भष्ट्राचार, भीती, सूड आणि धोका याचे मिश्रण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अरशद वारसी ची फसवणूक केल्याबद्दल पोलिस भूमिवर दबाव टाकतात आणि त्याच्या तपासासाठी तिला दुर्गामतीच्या हवेलीमध्ये घेऊन येतात. मात्र हवेलीत अजब गजब घटना घडू लागतात आणि भूमिच्या शरीरात दुर्गामती प्रवेश करते. त्यानंतर पुढे काय होते हे सिनेमात पाहिल्यावर कळेल. या सिनेमाचा ट्रेलर अक्षय कुमार याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (भूमि पेडणेकर हिची प्रमुख भूमिका असलेल्या 'दुर्गामती' चित्रपटाची रिलीज डेट आली समोर, अभिनेत्रीने सोशल मिडियावरुन दिली माहिती)

पहा ट्रेलर:

उत्कंठा वाढवणाऱ्या या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप आणि भूषण कुमार प्रॉडक्शन ने एकत्रितपणे हा सिनेमा निर्मित केला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे थिएटर्स ऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 11 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम वर हा सिनेमा रिलीज केला जाईल.