सलमान खान (Salman khan) आणि वाद यांचे जुने नाते आहे. सलमानचा असा कोणताही चित्रपट नाही ज्यावरून वाद निर्माण झाला नाही. मात्र, आता या वादापासून कसं लांब राहायचं हे सलमान खान चांगलंचं शिकला आहे. कॉन्ट्रोवर्सीमुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेल्या चित्रपटाचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा वाद टाळण्यासाठी आता सलमान खानने आपल्या आगामी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, लवकरच सलमान खान आता त्याच्या ठरलेल्या चित्रपटाचे शीर्षक बदलणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली,’ असं होतं. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानला या शीर्षकावरून वाद होऊ शकतो, असं वाटत आहे. त्यामुळे त्याने या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (वाचा - West Bengal Elections 2021: पायल सरकार, सयोनी घोष यांच्यासह 'या' सेलेब्सच्या राजकीय कारकीर्दीचा निर्णय आज ठरणार; मतमोजणीला झाली सुरूवात)
आपले भूतकाळातील अनुभव लक्षात घेऊन सलमानने हा निर्णय घेतला आहे. खरं तर, सलमानचा मेहुणे आयुषचा पहिला चित्रपट यापूर्वी 'लव्ह रात्री' असं होतं, ज्यावरून वादाला सुरुवात झाली. नंतर त्याचे नाव लव्ह यात्री असे ठेवलं गेलं. अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटाबाबतही असेच काहीसे घडले आहे. या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असं होतं. या नावावरून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. परिणामी अक्षयला आपल्या चित्रपटाचे नाव बदलावे लागले.
वेबसिरीज तांडवमध्येही असेचं काहीसे घडले आहे. यावर सीरिजवरुन मोठा वाद निर्माण झाला. या वेबसीरिजच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या फेऱ्या घालाव्या लागल्या आणि मालिकेत बदल करावे लागले. या सर्व घटना पाहून सलमान खानचे डोळे उघडले. हा चित्रपट तो आपला सहकारी निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासमवेत तयार करणार आहे. सलमानला त्याच्या चित्रपटावरून कोणताही वाद नको आहे. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.