Dream 2

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. परिणामी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण केली. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 3 दिवसांत 40 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने शुक्रवारी 10.69 कोटी, शनिवारी 14.02 कोटी आणि रविवारी 16 कोटींचा व्यवसाय करून एकूण व्यवसाय 40.70 कोटींवर नेला. ड्रीम गर्ल 2, राज शांडिल्य दिग्दर्शित, 2019 च्या हिट चित्रपट ड्रीम गर्लचा सीक्वल आहे.

पाहा पोस्ट -