Disha Patani (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अभिनेत्री आपल्या चाहत्यांसाठी अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री दिशा पाटनीने शुक्रवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती यलो कलरचा स्वेटर आणि व्हाईट कलरच्या ट्रॅक पॅन्टमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशासोबत दोन मुलीही डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला तिने 'जस्ट चिलिंग', कोरियोग्राफ आलिशा बेहूरा आणि अंकन सेन यांच्यासोबत डांसिंग माय ब्यूटी, असं कॅप्शन दिलं आहे.

दिशा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 41 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या या डान्स व्हिडिओला 8 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अभिनेत्री दिशा पटानी स्वत: च्या फिटनेसची खूपचं काळजी घेते. यापूर्वी तिने जिममध्ये वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (वाचा - Bachchan Pandey Release Date: Akshay Kumar ने जाहीर केली 'बच्चन पांडे' ची रिलीज डेट; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

दिशा पटनीने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लोफर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिने वरुण तेजाच्या विरोधी पात्राची भूमिका केली होती. परंतु, दिशाला खरी ओळख 'एमएस धोनी' चित्रपटातून मिळाली. त्यानंतर तिने 'बागी 2' मध्ये टायगर श्रॉफबरोबर काम केले. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशा पटनी सलमान खानच्या आगामी राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. या चित्रपटापूर्वी दिशा सलमानबरोबर भारत चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्रीदेखील चांगलीचं गाजली होती.