Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

Bachchan Pandey Release Date: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने आज आपल्या 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. रिलीज डेट जाहीर करताना अक्षयने स्वत:चा सिनेमातील लूक देखील शेअर केला आहे. (Akshay Kumar ने केले अयोध्या राम मंदिरासाठी दान; योगदानाचे चाहत्यांनाही आवाहन, Watch Video)

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, "त्याची एक झलकच पुरेशी आहे. बच्चन पांडे 26 जानेवारी, 2022 रोजी रिलीज होत आहे." या फोटोत अक्षय जबरदस्त लूक मध्ये दिसत आहे. यात त्याचा एक डोळा निळा दाखवण्यात आला आहे. त्याचा हा लूक भीतीदायक भासत आहे.

अक्षय कुमार पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या सिनेमात अक्षय कुमार शिवाय जॅकलीन फर्नांडिस, कृती सनॉन आणि अरशद वारसी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून फरहाद सामजी हे दिग्दर्शनाची सुत्रं सांभाळत आहेत. 22 जानेवारी 2021 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र कोविड-19 संकटामुळे सिनेमाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे रिलीज डेट तब्बल वर्षभर पुढे ढकलण्यात आली आहे.