Akshay Kumar ने केले अयोध्या राम मंदिरासाठी दान; योगदानाचे चाहत्यांनाही आवाहन (Watch Video)
Akshay kumar (Photo Credit - File Photo)

Akshay Kumar Donates for Ayodhya Ram Mandir Construction: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या अभिनय, अॅक्शन सीन्स, कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहेच. पण त्याचबरोबर त्याच्या ठायी असलेले सामाजिक भान यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, अक्षय कुमार याने आज अयोध्येत तयार होणाऱ्या श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली आहे. अक्षयने याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली असून या उदात्त कार्यात हातभार लावण्याचे आवाहन त्याने लोकांना केले आहे. लहानसा का होईना पण तुमचे योगदान मंदिर निर्मितीसाठी द्या, असे अक्षयने व्हिडिओत म्हटले आहे. (Akshay Kumar Films in 2021: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यंदा 'या' 6 चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर उडवणार खळबळ; पहा चित्रपटांची लिस्ट)

हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले की, "जय सियाराम. अयोध्येत आपल्या श्री राम च्या भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरु झाले आहे, याचा आनंद वाटतो. आता योगदानाची वेळ आपली आहे. मी सुरुवात केली आहे. आशा आहे की तुम्हीही यात सामिल व्हाल. जय सीयाराम."

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने या व्हिडिओत रामसेतूच्या निर्मितीची छोटीशी गोष्ट सांगितली आहे. राम सेतू उभारण्यासाठी खारुताईने देखील आपल्या परीने योगदान दिले. तिच्या या योगदानामुळे भगवान राम खुश झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिले. तसंच खारुताई प्रमाणे तुम्हीही तुमच्या परीने या कार्यात योगदान द्या, असे अक्षयने म्हटले आहे. (Ram Setu: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अक्षय कुमार सिनेमाच्या शूटींगसाठी अयोध्येत जाणार)

दरम्यान, अक्षय कुमार 'राम सेतू' असे नाव असलेला सिनेमा देखील लवकरच घेऊन येणार आहे. यासाठी त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी मुंबईत चर्चा देखील केली होती.