Disha Patani Hot Photo: सोशल मीडियावर दिशा पाटनी हिच्या बोल्ड फोटोंची चर्चा
दिशा पाटनी (Photo Credits: Instagram)

Disha Patani Hot Photo: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. दिशा ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिच्या हॉट फोटोंमुळे तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. दिशा ही तिच्या ग्लॅमरस लूकमुळे बोल्ड दिसत असली तरीही तिला उत्तम फॅशन सेन्स असल्याचे दिसून येते. तर दिशा हिने नुकताच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर त्या फोटोंनी आग लावली आहे. तर चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दिशा हिने शेअर केलेल्या फोटोत अधिकच बोल्ड आणि सेक्सी दिसून येत आहे. तिचा मेकअप सुद्धा तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

दिशा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत ब्लू डेनिम आणि ब्लॅक टॉप घातला आहे. तसेच दिशा हिचा मेकअप आणि हेअर स्टाइल सुद्धा तिच्या या लूकला शोभून दिसत आहे. दिशा हिने बोल्ड फोटो शेअर करत Red Eyes Messy Hair असे कॅप्शन लिहिले आहे.(करीना कपूर खान हिचे इंस्टाग्राम वर पदार्पण; 'अशी' आहे पहिली पोस्ट See Photo)

 

View this post on Instagram

 

Red eyes messy hair🐰

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा हिने काही दिवसांपू्र्वी तिच्या फोटोसोबत तिच्या कुत्र्याचा सुद्धा फोटो शेअर केला होता. तसेच ती फिटनेस फ्रिक असल्याचे ही तिच्या फोटोंमधून दिसते. तर अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाढदिवासाला सुद्धा दिशाने एक व्हिडिओ पोस्ट करत अनोख्या पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

मलंग चित्रपटातून दिशा झळकली होती. तसेच दिशासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल केमू सुद्धा मुख्य भुमिकेत दिसले होते. मोहित सुरी यांनी मलंग चित्रपट दिग्दर्शित केला असून बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नाही. दिशा सध्या सलमान खान याच्यासोबत आगामी चित्रपट राधे साठी शूटिंगमध्ये वस्त आहे.