करीना कपूर खान हिचे इंस्टाग्राम वर पदार्पण; 'अशी' आहे पहिली पोस्ट (See Photo)

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने काल आपले इंस्टाग्राम अकाउंट उघडून सोशल मीडियावर पदार्पण केले आहे

करीना कपूर खान हिचे इंस्टाग्राम वर पदार्पण; 'अशी' आहे पहिली पोस्ट  (See Photo)
Kareena Kapoor Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने काल आपले इंस्टाग्राम अकाउंट उघडून सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. इतर वेळेस नेहमी अप टू डेट असणारी किंबहुना सर्व नवेनवे ट्रेंड स्वतःच सेट करणारी करीना सोशल मीडियापासून मात्र मागील कित्येक वर्ष अलिप्त होती. काल म्हणजेच 5 मार्च रोजी करीनाने आपले इंस्टाग्राम अकाउंट (Instagram Account) सुरु केले, आणि पहिलीच पोस्ट अशी केली की ज्यातून तिच्या चाहत्यांचा सस्पेन्स वाढवून ठेवला होता. करीनाने ना स्वतःचा फोटो पोस्ट केला ना आपल्या फॅमिलीचा, ना लाडका लेक तैमूरचा. करीनाचे सोशल मीडिया पदार्पणाची पहिली पोस्ट होती एका मांजरीचा व्हिडीओ, आणि या व्हिडिओला कमिंग सून असे कॅप्शन लिहिले होते. यावरून खरंतर हे अकाउंट खरंच बेबोचे आहे की पुन्हा कुठलं फॅनपेज आहे, असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. तर आज करिनाने स्वतःचा फोटो पोस्ट करून या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

करीनाने आज आपली इनस्टाग्राम अकाउंट वरून स्पोर्टी लुक मधला फोटो शेअर केला आहे, या फोटोला तिने 'The cat's out of the bag' असे कॅप्शन देत त्या खाली हॅलो इंस्टाग्राम असे हॅशटॅग दिले आहे, फोटोमध्ये करिनाने घातलेल्या एका ब्रँडच्या लोगोचे इयररिंग घातले आहे. जे मांजरीसारखे दिसतेय त्यामुळे कदाचित मागच्या पोस्टमध्ये तिएन मांजरीचा रेफरसन्स दिला होता. Coronavirus चा धोका टाळण्यासाठी 'सलमान खान'ने सुचवला हटके उपाय; पहा पोस्ट

करीन कपूर इंस्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

The cat's out of the bag. #HelloInstagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

दरम्यान करीनाच्या पहिल्याच फोटोला दीड लाखाहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंटस मिळाल्या आहेत. आतापर्यंत करीनाच्या अकाऊंटला जवळपास 7 लाख जण फॉलो करतात.

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2020 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).