Disha Patani च्या आज बर्थ डे दिवशी वायरल होतेय तिची ऑडिशनची क्लिप; पहा कशी होती 10 वर्षांपूर्वी दिशा
Disha Patani (Photo Credits: Instagram)

नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूडच्या दिशा पाटनीचा (Disha Patani) आज (13 जून) 29 वा वाढदिवस आहे. दिशा पाटनी बॉलिवूड मध्ये सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या गोड स्माईलनेच अनेक जण घायाळ होतात. जाहिरात क्षेत्रापासून ब्लॉकबस्टर सिनेमांपर्यंत सारीकडे तिने आपली छाप पाडली आहे. दिशा तिच्या सिनेमांमुळे चर्चेमध्ये असते. सोशल मीडीयातही ती अ‍ॅक्टिव्ह असते. बोल्ड आऊटफीट्समुळे तिच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे. दरम्यान दिशा सिनेमांमध्ये येण्यापूर्वी जाहिरातक्षेत्रात आली. कोल्ड क्रीम , चॉकलेट्स आणि ब्युटी प्रोडक्ट्स यांच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. आज बर्थ डे गर्ल दिशाचा एक ऑडिशन देताना जुना व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.

दिशाच्या जाहिरात ऑडिशन मधील तिचा अंदाज आताच्या पेक्षा फार वेगळा आहे. ती एका कोल्ड क्रीमची जाहिरात करत आहे. त्यावेळी ती 19 वर्षांची होती. या ऑडिशन क्लिप मधील दिशा आणि आताची दिशा यामधील फरक प्रचंड आहे. तिच्या देहबोलीतला फरक, चेहर्‍यावरील बदल स्पष्ट दिसून येणारा आहे. क्लिप मध्ये पहिल्यांदा दिशा वेगवेगळ्या प्रोफाईल मध्ये दिसत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कॉस्ट्युम मध्ये ती जाहिरातीच्या वेगवेगळ्या लाईन्स बोलत आहे. आज तिच्या बर्थ डे च्या निमित्ताने हा व्हिडीओ सोशल मीडीयात अनेकांनी शेअर केला आहे. (नक्की वाचा: Disha Patani Birthday: दिशा पटानी ने आपल्या वाढदिवसानिमित्त आपला बिकिनीतील Hot फोटोज शेअर करुन चाहत्यांना दिले छान सरप्राईज).

पहा दिशाची पहिली जाहिरात

दिशाच्या फिल्मी करियरची सुरूवात 'लोफर' मधून झाली. नंतर तिने बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. दिशाने नुकताच सलमान खान सोबत 'राधे' सिनेमादेखील केला. खाजगी आयुष्यात दिशा पाटनी हिचे नाव टायगर श्रॉफ सोबत जोडले जातं. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याचा खुलेआम स्वीकार केलेला नाही पण अनेकदा दोघं एकत्र आऊटिंग करताना, फिरताना दिसले आहेत.