Dil Bechara World Television Premiere Today: सुशांत सिंह राजपूत चा 'दिल बेचारा' चित्रपटाचा आज वर्ल्ड प्रीमिअर; स्टार प्लसवर संध्याकाळी 8 वाजता होणार प्रसारित
Dil Bechara Movie Poster (Photo Credit: Twitter)

आपल्या अभिनयाची जादू पसरवून अचानक या जगातून एक्झिट घेतलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची शेवटची आठवण म्हणून OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला 'दिल बेचारा' (Dil Bechara)हा चित्रपट आज संध्याकाळी स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता स्टार प्लस (Star Plus) वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर (World Television Premiere) प्रसारित होणार आहे. सुशांतच्या असंख्य चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याच्या या चित्रपटला ऑनलाईन खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज सर्व चाहते हा चित्रपट टीव्हीवर पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला दिल बेचारा या चित्रपटाने प्रदर्शनानंतर काही तासांतच या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. सुशांत सिंह राजपूत याचा 'दिल बेचारा' सिनेमा IMDb रॅंकिंगवर अव्वल; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद (View Tweets)

स्क्रीप्ट न वाचताच केवळ मैत्रीखातर सुशांतने हा सिनेमा केल्याचे सिनेमाचे दिग्दर्शक आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबड़ा यांनी सांगितले आहे. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावा लागला.

दिग्दर्शक म्हणून मुकेश छाबड़ा आणि अभिनेत्री म्हणून संजना संघीचा हा पहिला चित्रपट जरी असला तरी कोणालाही कल्पना नव्हती की हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरेल.