बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेतील एक चमकणारा तारा सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. महत्त्वाकांक्षी असलेल्या सुशांत सिंह राजपूतची शेवटची आठवण म्हणून काही दिवसांपूर्वी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) आता लवकरच टीव्हीवर पाहायला मिळणारा आहे. सुशांतच्या असंख्य चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याच्या या चित्रपटला ऑनलाईन खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ 24 तासांत 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट इंटरनेटवर पाहिला. 24 जुलैला दिल बेचारा डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट स्टार प्लस (Star Plus) या वाहिनीवर पाहता येणार आहे.
मिडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, इंटरनेटवर आलेला सुशांतचा हा चित्रपट येत्या 9 ऑगस्टला म्हणजेच रविवारी टीव्हीवर दाखवला जाईल. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे सांगितले होते की, ते हा चित्रपट प्रदर्शित करुन सुशांतला श्रद्धांजली देऊ इच्छितात. इंडिया फोरम्सच्या रिपोर्टने सुद्धा याला दुजोरा दिला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या बँक अकाऊंटमधून 90 दिवसांत रिया चक्रवर्तीने खर्च केले 3 कोटी रुपये; बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिली माहिती- रिपोर्ट्स
दिग्दर्शक म्हणून मुकेश छाबड़ा आणि अभिनेत्री म्हणून संजना संघीचा हा पहिला चित्रपट जरी असला तरी कोणालाही कल्पना नव्हती की हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरेल.
या चित्रपटाला इंटरनेटवर सुशांतच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. सुशांतला शेवटचे पडद्यावर पाहून सर्व चाहते भावुकही झाले होते. तशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर पाहायला मिळत होत्या.