दीपिका पादुकोण ने इरफान खान सोबत बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ केला शेअर, या दिवंगत अभिनेत्याला केली 'ही' विनंती
Deepika Padukone and Irrfan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड तसेच हॉलिवूड मध्येही स्वत:ची ओळख निर्माण केलेला हरहुन्नरी कलाकार इरफान खान (Irrfan Khan)याची अचानक झालेली एक्झिट संपूर्ण बॉलिवूड जगताला चटका लावणारी होती. इरफानच्या जाण्याने न केवळ बॉलिवूड जगत हळहळला तर संपूर्ण देशही हळहळला. आपल्या चित्रपटांतून इरफानने स्वत:ची अशी वेगळी छाप सोडली होती. त्यामुळे त्याच्या सोबत काम केलेल्या अनेकांनी शूटिंग दरम्यानच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यात 'पिकू' (Piku)चित्रपटात त्याच्या सोबत झळलेली दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने देखील इरफान सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती इरफानसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ 'पिकू' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. मात्र या व्हिडिओ खाली दिपिकाने इरफानला एक भावूक विनंती केली आहे.

हेदेखील वाचा- 'पिकू' सिनेमाला 5 वर्ष पूर्ण; 'लम्हे गुज़र गये' म्हणत दीपिका पदुकोण हिची इरफान खान साठी भावूक पोस्ट

 

View this post on Instagram

 

please come back!💔 #irrfankhan

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

'कृपया परत ये' असे दीपिकाने या पोस्ट खाली म्हटले आहे. काल म्हणजेच 8 मे ला पिकू या चित्रपटाला 5 वर्षे पुर्ण झाल्यामुळे या चित्रपटातील कलाकारांनी इरफानसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता.

लवकरच दीपिका '83' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात दीपिका पुन्हा एकदा रणवीर सिंह सोबत झळकणार आहे. '83' मध्ये रणवीर सिंह 'कपिल देव' यांची भूमिका साकारत असून दीपिका त्यांची पत्नी 'रोमी भाटीया' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.