'पिकू' सिनेमाला 5 वर्ष पूर्ण; 'लम्हे गुज़र गये' म्हणत दीपिका पदुकोण हिची इरफान खान साठी भावूक पोस्ट

दीपिका-इरफान यांच्या 'पिकू' या सिनेमाला आज 5 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने इरफान खानसाठी तिने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. पिकू सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

'पिकू' सिनेमाला 5 वर्ष पूर्ण; 'लम्हे गुज़र गये' म्हणत दीपिका पदुकोण हिची इरफान खान साठी भावूक पोस्ट
Deepika Padukone, Irrfan Khan, Shoojit Sircar on the sets of Piku (Photo credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही को-स्टार आणि मित्र इरफान खान (Irrfan Khan) याच्या आठवणीत भावूक झाली आहे. दीपिका-इरफान यांच्या 'पिकू' (Piku) या सिनेमाला आज 5 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने इरफान खानसाठी तिने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. पिकू सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. हा कॅनडीड फोटो खरंच फार मोहक आहे. यातील दीपिका-इरफानची हसरी भावमुद्रा लक्षवेधी आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दीपिकाने पिकू सिनेमातील गाणे 'लम्हे गुज़र गये' च्या काही ओळी लिहिल्या आहेत. इरफान खान या आपल्या जीवलग मित्राच्या आठवणीत तिने या गाण्यासह खास पोस्ट केली आहे. 29 एप्रिल रोजी इरफान खान याचे निधन झाले. कॅन्सरशी झुंज अपयशी ठरल्यानंतर त्याने मृत्यूला मिठी मारली. त्याचा अकाली निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. चाहत्यांसह अनेकजण हळहळले. आज पिकू सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत दीपिकानेही इरफान विषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. (बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर पत्नी सुतापा सिकदर झाली भावूक)

दीपिका पदुकोण पोस्ट:

 

View this post on Instagram

 

लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में पल में रुला दिया पल में हसा के फिर रह गये हम जी राहो में थोड़ा सा पानी है रंग है थोड़ी सी छावो है चुभती है आँखो में धूप ये खुली दिशाओ में और दर्द भी मीठा लगे सब फ़ासले ये कम हुए ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये हम थे अंजानी राहो में थोड़ी सी बेरूख़ी जाने दो थोड़ी सी ज़िंदगी लाखो स्वालो में ढूंधू क्या थक गयी ये ज़मीन है जो मिल गया ये आस्मा तो आस्मा से मांगू क्या ख्वाबो से रस्ते सजाने तो दो यादो को दिल में बसाने तो दो -Piku Rest in Peace my Dear Friend...💔 #rana #piku #bhaskor @shoojitsircar @juhic3 #5yearsofpiku

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

इरफानसोबतच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. इरफान खान याच्या निधनानंतर दीपिकाने ब्लॅक स्क्रिन आणि हार्ट ब्रेक इमोजी शेअर केला होता. यावरुनच इरफान खान याचे निधन दीपिकाला निशःब्द करणारे होते हे स्पष्ट होते.

लवकरच दीपिका '83' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात दीपिका पुन्हा एकदा रणवीर सिंह सोबत झळकणार आहे. '83' मध्ये रणवीर सिंह 'कपिल देव' यांची भूमिका साकारत असून दीपिका त्यांची पत्नी 'रोमी भाटीया' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2020 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).