दीपिका पादुकोण हिने सांगितले पती रणवीर सिंग ह्याच्या उत्साहाचे गुपित
दीपिका पादुकोण हिने सांगितले पती रणवीर सिंग ह्याच्या उत्साहाचे कारण (Photo Credits-Twitter)

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा खुप चार्मिंग व्यक्तिमत्व असलेला कालाकार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच रणवीर हा नेहमीच प्रेक्षकांच्या समोर आल्यास तो खुपच अतिउत्साहात असल्याचे दिसून येते. तसेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिला बऱ्याच जणांनी रणवीरच्या अतिउत्साहाबाबतचे गुपित काय आहे याबद्दल विचारले आहे. मात्र या मागील कारण आता चक्क बायको दीपिका पादुकोण हिने सांगितले आहे.

कोच्चि येथील एका मुलाखतीत दीपिकाने रणवीरच्या अतिउत्साहात राहण्यामागील गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यावेळी दीपिका असे म्हणाली की, रणवीर जेव्हा घरातून बाहेर पडतो त्यावेळी माहिती नाही त्याला काय होते. तो एकदम वेगळ्या पद्धतीने वागायला सुरुवात करतो. त्याचसोबत तिने असे ही सांगितले की, सकाळच्या डायट नाश्तासाठी रणवीरला मी फक्त बदाम आणि नारळाचे पाणी देते. यावरुन आता असा तर्क काढला जात आहे की, रणवीरचा सकाळचा नाश्ता हे त्याच्या अतिउत्साहाचे कारण आहे.(हेही वाचा-व्हिडिओ: रणवीर सिंह याने करीनाकडे मागितल्या टीप्स म्हणाला 'टॉप पती कसे व्हायचे सांग ना')

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

गली बॉय चित्रपटाच्या यशानंतर आता रणवीर क्रिकेटर कपिल देव यांच्या बायोपिकमधून मुख्य भुमिका साकारणार आहे. यासाठी रणवीरने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दीपिका तिचा आगामी चित्रपट 'छप्पाक' मधून झळकणार आहे.