Shah Rukh Khan Death Threat: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका वकिलाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी अटक (Arrest) केली होती. आज मुंबई न्यायालयाने (Bombay Court) आरोपी वकिलाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने आरोपी वकिलाला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शाहरुख खानला 12 नोव्हेंबरला धमकी दिल्याच्या आरोपावरून आरोपीला रायपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात आरोपीने अभिनेत्याला धमकावून 50 लाखांची मागणीही केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला नेले होते. तेथे त्याची अधिक चौकशी करण्यात आली. यापूर्वी अभिनेता सलमान खानलाही अशा धमक्या आणि खंडणीचे कॉल आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) संतोष सिंह यांनी सांगितले की, रायपूरच्या पंढरी पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आरोपी फैजान खान याच्या नावाने नोंदणीकृत फोन वापरून शाहरुख खानला धमकी आणि खंडणीचा कॉल करण्यात आला होता. आरोपी हा व्यवसायाने वकील आहे. चौकशीत त्याने आपला मोबाईल हरवल्याचे पोलिसांना सांगितले. (हेही वाचा - Shah Rukh Khan Receives Death Threat: किंग खान शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक; 50 लाखांची मागितली खंडणी)
या संदर्भात त्याने रायपूरमधील खामरडीह पोलीस ठाण्यात 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक 7 नोव्हेंबरला रायपूरला पोहोचले होते. पोलिसांनी वकील फैजान खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले, तेथून त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आले होते. (हेही वाचा - Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी)