Dadasaheb Phalke International Film Festival 2022: रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, रवीना टंडन यांना यंदाचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार घोषित (See Full List) 
Ranveer Singh (Photo Credits-Facebook)

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2022 (Dadasaheb Phalke International Film Festival 2022) रविवारी पार पडले. यावेळी भारतीय चित्रपटात आणि मालिकेतील योगदानाबद्दल अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांच्या अधिकृत ट्विटर हँडलने विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर केली. बॉलीवूड अभिनेत्री आशा पारेख यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी 2022 चा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार मिळाला.

पहा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग (83)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृती सेनन (मिमी)

क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिद्धार्थ मल्होत्रा (शेरशाह)

क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कियारा अडवाणी (शेरशाह)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक (कागज)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता (बेल बॉटम)

नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष शर्मा (अंतिम)

पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यू दसानी

पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदन

सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी (तडप)

फिल्म ऑफ द इयर- पुष्पा: द राइज

समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट- सरदार उधम

सर्वोत्कृष्ट चित्रपट - शेरशाह

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- अनादर राउंड

सर्वोत्कृष्ट लघुपट- पाउली

वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता- द फॅमिली मॅन 2 साठी मनोज बाजपेयी

वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अरण्यकसाठी रवीना टंडन

सर्वोत्कृष्ट वेब सिरीज- कँडी

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- कुछ रंग प्यार के ऐसे भी साठी शाहीर शेख

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कुंडली भाग्यसाठी श्रद्धा आर्या

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेता- कुंडली भाग्यासाठी धीरज धूपर

टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री- अनुपमासाठी रुपाली गांगुली

टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर- अनुपमा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष स्टेट ऑफ सीज:टेंपल अटॅक

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयकृष्ण गुम्माडी, हसिन दिलरुबा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष- विशाल मिश्रा

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - कनिका कपूर

दरम्यान, दादासाहेब फाळके यांच्या नावाने एक पुरस्कार भारत सरकार दरवर्षी सिनेसृष्टीतील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला देते. भारत सरकारने 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासारखेच पुरस्कार मुंबईतील अनेक संस्थांनी दादासाहेब फाळके यांच्या नावाने देण्यास सुरुवात केली आहे. यातीलच एक संस्था गेली अनेक वर्षे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार या नावाने पुरस्कार देत आहे.