कंगना रानौत (Photo Credits: Instagram)

Criminal Complaint Filed Against Kangana Ranaut:  बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या बद्दलच्या चर्चा थांबण्याचे नावच घेत नाही आहे. तर आता महापालिकेबद्दल अपशब्द वापरल्याने अपराधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात हा गुन्हा कंगनाच्या विरुद्ध दाखल केला गेला आहे. स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर शहरातील एका वकीलाने गुरुवारी हा अपराधाची तक्रार दाखल केली आहे. याआधी वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार कंगना विरुद्धा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे काल पोलिसांनी तिला समन्स धाडले असून बहिण रंगोली चंडेल हिच्यासह अधिकाऱ्यांसमो चौकशीसाठी बोलावले आहे.(Mumbai Police Summons Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत व बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स; जाणून घ्या काय आहे कारण)

अंधेरी कोर्टात वकील अली कासिफ खान देशमुख यांनी कंगना रनौत हिच्यावर राजद्रोह आणि तिने केलेल्या ट्विटमधून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा आरोप लगावला आहे. तक्रारीत असे ही म्हटले की, बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदे आणि अधिकृत सरकारी संस्थांचा सम्मानच करत नाही आहे. तिने महापालिकेची चेष्टा सुद्धा केल्याचे म्हटले आहे.(#BoycottErosNow: स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अश्लीलतेचे ठिकाण म्हणत कंगना रनौत हिला राग अनावर)

Tweet:

Tweet:

तक्रारीत असे म्हटले गेले होते की, वांद्रे कोर्टातर्फे पोलिसांनी कंगना रनौतच्या विरोधात FIR दाखल केल्याचे आदेश दिल्यानंतर रनौत हिने महापालिकेवर निशाणा साधत त्यांना पप्पू सेना म्हटले. या प्रकरणी येत्या 10 नोव्हेंबरला सुनावणी पार पडणार आहे.