कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात दक्षता घेण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. प्रामुख्याने गर्दी आणि लोकांशी येणारा संपर्क टाळला जात आहे. जगभरातील नागरिकांनी असेच सहकार्य करण्याची अपेक्षा असताना सेलीब्रेटी मंडळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ट्रोल होत आहे. अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) आणि सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) या दोघी याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. सोनाली बेंद्रे हिने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटोच तिच्या ट्रोलिंगचे कारण ठरत आहे.
देशातील अनेक सेलेब्रिटी मंडळींनी आपल्या घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन ठेवले आहे. त्यामुळे अनेक मंडळी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीदेखील गेले काही दिवस घराबाहेर पडली नाही. तिने स्वत:च इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून तशी माहिती दिली होती. आपण घराबाहे पडत नसून घरातच इंटरनेट सर्फिंग करत असल्याचे तिने म्हटले होते.
दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात ती आपली बहिण गायत्री जोशी हिच्या गालाचे चुंबन घेताना दिसते आहे. फोटो पाहिल्यावर प्रथमदर्शनी तर असे दिसते की, सोनाली कुलकर्णी बहिण गायत्री जोशी (ओबेरॉय) हिच्यासोबत Hangout करण्यासाठी निघाली आहेत. नेमक्या याच फोटोमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. (हेही वाचा, Coronavirus: बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोना व्हायरसची लागण)
इन्स्टाग्राम पोस्ट
सोनाली बेंद्रे हिला गायत्री जोशी हिच्याशी चुंबन घेताना पाहून सध्या कोराना व्हायरसचे संकट आहे. त्यामुळे काळजी घे. दुरावा ठेवणे आवश्यक आहे, असा सल्लाही ट्रोलर्सनी बेंद्रे हिला दिला आहे.
काही चाहत्यांनी म्हटले आहे की, तुम्ही लोक अनेकांचे आयडॉल आहात. Coronavirus संकटाचा वाढता प्रभाव पाहता आपण लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, तुम्हाला अनेक लोक फॉलो करतात. तुम्ही मास्क परिधान करुनच तुमच्या बहिणीला भेटायला हवे होते.