Sunil Pal (Photo Credits: Instagram)

स्टॅन्डअप कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) सध्या बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सुनील पाल हे त्यांच्या कार्यक्रमानंतर बेपत्ता झाले असून त्यांचा फोन देखील बंद आहे. सुनील पाल यांची पत्नी सुनिता यांनी सांताक्रुझ पोलिस स्टेशन (Santacruz Police Station) मध्ये सुनिल पाल बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. सुनिल पाल हे प्रसिद्ध स्टॅन्डअप कॉमेडिअयन आहे. 2005 च्या The Great Indian Laughter Challenge मधून ते घराघरात पोहचले आहेत. मात्र अचानक त्यांच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने चाहत्यांमध्येही चिंता पसरली आहे.

सुनील पाल मुंबई बाहेर एका कार्यक्रमासाठी गेले आहेत. आज 3 डिसेंबर दिवशी ते पुन्हा परतणार होते. मात्र अजूनही ते आलेले नाहीत. त्यांची पत्नी सरिता त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांचा संपर्क झालेला नाही. पोलिस सध्या सुनिल पाल यांचा शोध घेत आहेत. शो बाबत अधिक तपास करत आहेत. त्यांना कोणी बोलावलं होत? त्यांच्यासोबत कोण होते? याचा तपास सुरू आहे.

सुनील पाल यांची 'गायब' होण्याआधीची पोस्ट

सुनील पाल बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते बोटीत सेफ्टी जॅकेट घालून बोटीने प्रवास करताना दिसत आहेत. Sunil Pal Criticizes The Great Indian Kapil Show: "हे सगळं खूप घृणास्पद वाटतं..." ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल कॉमेडीयन सुनील पालची टीका .

सुनील पाल यांनी कॉमेडियन म्हणून अनेक स्टॅन्डअप शोज केले. त्यानंतर अभिनयातही त्यांनी नंशीब आजमावलं आहे. त्यांनी 'फिर हेरा फेरी', 'अपना सपना मनी मनी', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'किक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.