Sunil Pal Criticizes The Great Indian Kapil Show:

कपिलचा द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) हा कार्यक्रम सध्या नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये हिरामंडी या वेब सीरिजची संपूर्ण स्टार कास्ट हजेरी लावणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना सुनील पाल यांनी द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमामधील कलाकारांवर टीका केली आहे. सुनील पालनं सांगितलं, "नेटफ्लिक्सवरील बाकीचा कंटेन्ट वल्गर आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये बरेच सेलिब्रिटी आले. पण शोमधील आर्टिस्ट नवीन गोष्टी करत नाहीयेत. 40 लेखक शोसाठी लिहित आहे, असं मी ऐकलंय. पण नवं काहीच शोमध्ये दिसत आहे." (हेही वाचा - Jackie Shroff Moves Delhi HC : जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात धाव; नाव, आवाज, फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप, विविध संस्थांविरुद्ध खटला दाखल)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील पाल मुलाखतीत म्हणाला, “सुनील ग्रोवर मुलींसारखा अभिनय करतो आणि लोकांच्या मांडीवर जाऊन बसतो. तो स्त्रियांचे कपडे घालतो आणि गलिच्छ काहीतरी बोलत असतो, यामुळे ते सगळं खूप घृणास्पद वाटतं.” सुनील पाल पुढे म्हणाला, “स्त्रियादेखील एवढ्या हपापलेल्या नसतात जेवढा या शोमध्ये सुनील ग्रोवरला दाखवलं आहे. कपिलच्या शोमध्ये हे सगळं दाखवण्यापेक्षा खरे विनोद दाखवले तर बरं होईल. “

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे एपिसोड्स दर शनिवारी आणि रविवारी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरसह राजीव ठाकूर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक हे कलाकार आहेत; तर अर्चना पुरण सिंगदेखील या शोमध्ये आहेत. या शोच्या आगामी भागात हिरामंडी या शोची संपूर्ण टीम हजेरी लावणार आहे.