Car Accident: ऋतिक रोशन च्या 'लक्ष्य' चित्रपटातील कर्नल मनीष सिंह चौहान यांचा रस्ते अपघातात मृत्यू
ऋतिक रोशन च्या 'लक्ष्य' चित्रपटातील सीन (Photo Credits: YouTube)

Car Accident: आज सकाळी राजस्थान (Rajasthan) मध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) दोन जवानांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. कर्नल मनीष सिंह चौहान (Colonel Manish Singh Chauhan) आणि मेजर नीरज शर्मा (Major Neeraj Sharma) असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. प्राप्त माहितीनुसार, कर्नल मनीष सिंह चौहान यांनी 2004 मध्ये ऋतिक रोशनच्या लक्ष्य चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी ऋतिक रोशनसोबत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

राजस्थान डिफेन्स PRO ने दिलेल्या माहितीनुसार, बीकानेर जयपुर हायवेवर आर्मी जवानांच्या गाडीला अपघात झाला. यात कर्नल मनीष सिंह चौहान आणि मेजर नीरज शर्मा यांचा मृत्यू झाला. तसेच गाडीतील इतर जण जखमी झाले आहेत. जखमींना PBM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात जर्नलिस्ट आदित्य राज कौल यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Rhea Chakraborty and Sushant Singh Rajput Smoking Video: रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत चा 'स्मोकिंग व्हिडिओ' व्हायरल)

दरम्यान, 2004 मध्ये फरहान अख्तर यांनी लक्ष्य चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत प्रीति जिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी आणि बोमन ईरानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात ऋतिक रोशनने लेफ्टिनेंट करण शेरगिल यांची भूमिका साकारली होती.