Sushmita Sen लवकरच होणार आत्या, वहिनी Charu Asopa ने Baby Bump फ्लाँट करत शेअर केले फोटोज
Charu Asopa Pregnant (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. सुष्मिताची वहिनी चारू असोपा (Charu Asopa) ही लवकरच आई होणार असून तिने आपले बेबी बम्प सहित काढलेले खास फोटोज शेअर केले आहेत. सुष्मिता सेन लवकरच आत्या बनणणार असल्याने तिचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राजीव सेन (Rajiv Sen) आणि चारू असोपा यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. चारू ने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करुन आपण आई होणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

चारू असोपा हिने इन्स्टाग्रामवर बेबी बम्प फ्लाँट करत फोटोज शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिचे कमेंट्सच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. "मी सर्वांची आभारी आहे" असे सांगत तिने फोटोज शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

हेदेखील वाचा- कोविड-19 संकटात अभिनेत्री Sushmita Sen ची मोठी मदत; रुग्णालयाला केला ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

16 जून 2019 ला गोव्यामध्ये राजीव आणि त्याची गर्लफ्रेंड चारू असोपा (Charu Asopa) लग्नबंधनात अडकले. गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंग ला जवळच्या लोकांना बोलावण्यात आले होते. लग्नाचे विधी आणि लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज सुष्मिताने सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले होते. हे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सुष्मिताने भावाच्या संगीत सोहळ्यात तिचा प्रियकर रोहमन शॉलसोबत खास रोमँटिक अंदाजात ‘नच दे वे सारे’ (Nach de ve sare) या गाण्यावर डान्स केला होता. तसेत तिच्या दोन्ही मुलींनी आणि चारूच्या कुटुंबियांनीही मनसोक्त डान्स केला होता. राजीव आणि चारूचं लग्न बंगाली आणि राजस्थानी या दोन्ही पद्धतीने गोव्यात पार पडले होते.