
कपिल शर्माच्या नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात अमरसिंग चमकीला या सिनेमाच्या प्रोमोशन निमित्ताने सिनेमाची टीम इम्तियाज अली, परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांनी हजेरी लावली. कपिलने या शोचे काही बिहाइंड द सीन सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये कपिल आणि इम्तियाज अली यांनी काही खुलासे केले आहे. (हेही वाचा - Shreyas Iyer: श्रेयस अय्यर पाहायचा 'तिच्या' मेसेजची वाट, पण ती कोण? कपिलच्या शोमध्ये सांगितली खास आठवण)
कपिलने यावेळी सगळ्यांना सांगितलं,' मी एकदा रहमान सरांना भेटलो आणि ते मला म्हणाले,’मी तुला चमकीलासाठी फोन केला होता.’ मला वाटलं कि त्यांना माझ्याकडून कोणतंतरी गाणं गाऊन घ्यायचं असेल कि काहीतरी. मला वाटलं ते असंच माझ्याशी चांगलं बोलतायत.' त्यावर इम्तियाज यांनी उत्तर दिलं कि,”मलाही ही रहमान यांनीच सांगितलं कि तू फार छान गातोस. जर दिलजीतने ही फिल्म केली नसती तर आमची दुसरी चॉईस तू होतास.” ते ऐकून सगळेचजण हसू लागले.
दिलजीत या सिनेमात अमरसिंग चमकीला यांची भूमिका साकारत असून परिणीती चोप्राने त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका साकारली आहे. ए आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं असून सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा आहे. दरम्यान नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अमरसिंग चमकीला हा सिनेमा ‘इल्व्हिस ऑफ पंजाब’ म्हणून प्रसिद्ध असलेले गायक अमरसिंग चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 80 च्या दशकात एका कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. समाजातील समस्या गाण्यांच्या माध्यमातून मांडण्यासाठी चमकीला हे प्रसिद्ध होते.