Bullets Trailer: 'बुलेट' या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी (Sunny Leone) आणि करिश्मा तन्ना (Karishma Tanna) एकत्र दिसणार आहेत. या वेबसीरिजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये सनी आणि करिश्माचा लूक पाहण्यासारखा आहे. देवांग ढोलकिया यांच्या आगामी थ्रिलर वेब सीरिजमध्ये सनी लिओनी आणि करिश्मा तन्ना एका धोकादायक मिशनसाठी निघाल्या आहेत. या मिशनमध्ये दोन देशांमधील अवैध शस्त्र व्यापार थांबवायचा आहे. 2 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये या दोन्ही अभिनेत्रींनी चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. या ट्रेलरमध्ये सनी आणि करिश्मा तन्नाचा सेक्सी लुकही पाहायला मिळत आहे. या दोन अभिनेत्रींची सौंदर्याने भरलेली शैली आणि बुलेटसोबत खेळण्याची पद्धत प्रेक्षकांना घायाळ करत आहे.
बुलेट वेबसीरिजला निर्मात्यांना शॉर्ट फिल्म म्हणून प्रदर्शित करायचं होतं. परंतु, नंतर त्यांनी यास वेब सिरीज स्वरूपात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षक ही वेब सीरिज MX Player वर पाहू शकतात. येत्या 30 ऑक्टोबरपासून ही वेब सीरिज पाहता येणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून सनी बर्याच दिवसानंतर पडद्यावर दिसणार आहे. असं असलं तरी, सनीचा जलवा सोशल मीडियावरही दिसून येत आहे. (वाचा - Nusrat Jahan Photos: तृणमूल काँग्रेसच्या खासदार, अभिनेत्री नुसरत जहा यांनी केलं ग्लॅमरस फोटोशूट; पहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो)
सनी आपल्या सोशल मीडियावरून स्वत: चे हॉट फोटोज तसेच व्हिडिओज पोस्ट करत असते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. सनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. सनीने पॉर्न इंजस्ट्री सोडल्यानंतर अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे.
भारतात येण्याअगोदर सनी परदेशात पॉर्नस्टार म्हणून ओळखी जात होती. परंतु, त्यानंतर सनी आता हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब अजमावते आहे. भारतीय-कैनेडियन असलेल्या सनी लिओनीने 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. त्यानंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.