बॉलिवूड स्टार हृतिक रोशन याची धर्मा प्रॉडक्शनच्या 'या' चित्रपटात लागली वर्णी
Bollywood star Hrithik Roshan (PC - Instagram)

बॉलिवूड स्टार हृतिक रोशनची (Bollywood Star Hrithik Roshan) धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात (Dharma Productions Film) वर्णी लागली आहे. हृतिकने 2019 मध्ये 'सुपर 30' आणि 'वॉर' या दोन सुपरहिट चित्रपटांत मुख्य अभिनेत्याची भूमिका केली. त्याच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता दिग्दर्शक करण जौहर यांच्या धर्मा प्रोडक्शनच्या आगामी 'स्पाय थ्रिलर' (Spy Thriller) या चित्रपटात हृतिकची वर्णी लागली आहे.

हा चित्रपट भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख आणि संस्थापक रामेश्वर नाथ काव (Indian Spymaster R N Kao) यांच्या जीवनावर आधारित आहे. 'टेली चक्कर' या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध लेखक नितीन गोखले यांनी काव यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे. करण जौहर काव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यास उत्सुक असून त्याने या चित्रपटासाठी हृतिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु, अद्याप हृतिकने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. (हेही वाचा - नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside)

1962 चे चीन भारत युद्ध, 1965 चे भारत पाक युध्द झाल्यावर गुप्तचर यंत्रणांचा कमजोरपण लक्षात आला. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देशाच्या अधिक सुरक्षेची गरज जाणवली. त्यातून 'रॉ'चा जन्म झाला असे म्हटले जाते. रॉची सुरुवात 21 सप्टेंबर 1968 ला झाली. रॉचे पहिले अध्यक्ष म्हणून रामेश्वर नाथ काव यांची नियुक्ती करण्यात आली. भारताच्या सुरक्षिततेमध्ये रॉचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आता काव यांची कामगिरी पडद्यावर पाहता येणार आहे.

हृतिक रोशन सध्या फराह खान यांच्या ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच क्रिश सिनेमाच्या 4 भागातही हृतिक मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र, हृतिकने अद्याप कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. करणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'स्पाय थ्रिलर' या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.